फ्लेमिंगोबद्दल माहीत नसलेल्या १० रंजक गोष्टी!!

लिस्टिकल
फ्लेमिंगोबद्दल माहीत नसलेल्या १० रंजक गोष्टी!!

फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. पुण्यातल्या उजनी धरण क्षेत्रात, मुंबईच्या खाडी परिसरांत दरवर्षी या सुंदर पक्ष्यांचे स्थलांतर पाहायला मिळते. हे पक्षी लांबसडक पाय, गुलाबी पंख, उभी राहायची ठराविक पद्धत त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे पक्षी कच्छमधून स्थलांतर होतात. तिथले पाणी आटते आणि फ्लेमिंगो देशभर फिरतात. पाण्याची उथळ जागा शोधतात आणि तिथे राहतात. फ्लेमिंगोच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतील. पण आज या लेखात आपण आणखी १० रंजक गोष्टी पाहूयात, कदाचित ही माहिती तुमच्यासाठी नवीन असू शकेल.

1. फ्लेमिंगोचे मातीचे घरटे

1. फ्लेमिंगोचे मातीचे घरटे

फ्लेमिंगोचे घरटे म्हणजे मातीचे किंवा चिखलाचे छोटे-छोटे डोंगर असतात. यामध्ये त्यांच्या अंड्यांची खोली असते. फ्लेमिंगोची अंडी आकाराने मोठी असतात. फ्लेमिंगो तसे एकनिष्ठ असतात. नर मादी जोडीने मिळून घरटे बांधतात. अंडी झाल्यावर त्याची काळजी दोघेही घेतात. फ्लेमिंगोची पिल्ले पांढर्‍या-राखाडी रंगाची असतात. तसेच त्यांची चोच ही सरळ असते. त्यांचे पंख गुलाबी व्हायला आणि हुक-आकाराची चोच व्हायला बरीच वर्षे लागतात. चिखलापासून बनविलेली घरटी मिनी ज्वालामुखीसारखी दिसतात. पुढे उभे असलेल्या फ्लेमिंगोच्या पंखांखाली एक पिल्लू असते आणि इतर फ्लेमिंगो पार्श्वभूमीवर उभे राहतात.
 

2.फ्लेमिंगोचा गुलाबी रंग अन्नामधून येतो

2.फ्लेमिंगोचा गुलाबी रंग अन्नामधून येतो

फ्लेमिंगो जे अन्न खातात त्यातूनच त्यांना गुलाबी रंग मिळतो. बर्‍याच वनस्पतींमध्ये नैसर्गिक लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगद्रव्ये तयार होतात. त्यांना कॅरोटीनोइड (carotenoids )म्हणतात. कॅरोटीनोइड्स मुळेच गाजरांना केशरी रंग किंवा टोमॅटोला लाल रंग येतो. फ्लेमिंगो समुद्रातील कोळंबी खातात, तसेच शेवाळे ही खातात. या अन्नातील रंगांमुळे त्यांच्या पंखांना गुलाबी रंग येतो.

3.फ्लेमिंगोची खाण्याची पद्धत वेगळी आहे.

3.फ्लेमिंगोची खाण्याची पद्धत वेगळी आहे.

फ्लेमिंगो फिल्टर फीडर असतात. ते algie म्हणजे एकपेशीय वनस्पती, लहान बिया, लहान क्रस्टेशियन्स (ब्राइन कोळंबीसारखे), माशाच्या अळ्या व पाण्यामध्ये राहणारी इतर वनस्पती आणि प्राणी खातात.

पाण्यात जेव्हा खाण्याची वेळ येते तेव्हा फ्लेमिंगोचे डोके वरच्या बाजूला असते. त्याची चोच पायांच्या दिशेने असते. तेव्हा तो डोके हलवून पाणी पितो. जीभ वापरुन त्याच्या चोचीमध्ये पाणी बाहेरून आत जोरात ओढतो. त्याच्या चोचीच्या टोकावर कंगव्यासारख्या प्लेट्स असतात. त्यातून पाणी बाहेर येते, पण अन्न आतच अडकते. त्यालाच फिल्टर फीडिंग म्हणतात. ज्यामुळे पाणी आतबाहेर होते, पण अन्न आत अडकून राहते.

हिवाळ्यात काडीसारखे पाय आणि लांब पण थोडीशी वाकडी मान असलेल्या गुलाबी फ्लेमिंगोंचे गट तलावामध्ये उभे असतात. एकमेकांजवळ उभे राहून ते उबदार राहतात. उष्ण हवामानात फ्लेमिंगो पाण्यात उभे राहून स्वत:ला थंड ठेवतात. हिवाळ्यामध्ये प्राणीसंग्रहालयात पक्ष्यांचा कळप उबदार ठेवण्यासाठी नैसर्गिक थर्मोरेग्युलेशन लागू करतात. तिथल्या वातावरणात बर्फ पडत असेल तर फ्लेमिंगो पूल ७० डिग्री फारेनहाइट इतक्या तापमानावर ठेवला जातो.

४. फ्लेमिंगोच्या गटास फ्लॅम्बॉयन्स (flamboyance) म्हणतात

४. फ्लेमिंगोच्या गटास फ्लॅम्बॉयन्स (flamboyance) म्हणतात

इंग्रजीत कावळ्यांच्या गटाला murder म्हणतात, तर फ्लेमिंगोच्या गटाला किंवा कळपाला फ्लॅम्बॉयन्स म्हणतात. फ्लेमिंगो गटासाठी काहीजण स्टँड, कॉलनी आणि पॅट हे शब्द देखील वापरतात.

जंगलात, फ्लेमिंगो कधीकधी हजारोंच्या संख्येने एकत्र जमतात! बहामास आणि क्युबा, मेक्सिको आणि दक्षिण कॅरिबियन येथील जंगलात २ लाखाहून जास्त संख्येने कॅरेबियन फ्लेमिंगो आहेत. तसेच गॅलपागोस बेटांमध्ये फ्लेमिंगोचे सुमारे ४००-५०० चे छोटे गट आहेत. हवं चमकदार गुलाबी पंखांचे फ्लेमिंगो एकत्र गटात असतात तेव्हा अजून सुंदर दिसतात.
 

५. फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती आहेत.

५. फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती आहेत.

कॅरिबियन फ्लेमिंगो ही एक जात आहे. याशिवाय lesser, greater, जेम्सचे (किंवा पुना), चिलीअन (Chilean) आणि अँडियन फ्लेमिंगो अश्या सहा प्रजाती आहेत.

ग्रेटर फ्लेमिंगो आफ्रिका, आशिया आणि युरोपच्या काही भागात आढळतात. ते सर्वात मोठे आणि उंच फ्लेमिंगो आहेत.चिली, अँडियन आणि जेम्सचे फ्लेमिंगो केवळ दक्षिण अमेरिकेत आढळतात. अँडियन फ्लेमिंगो हे सर्वात दुर्मिळ आहेत. त्यांची संख्या ४०,००० पेक्षा कमी आहे. Lesser फ्लेमिंगो आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या भागांमध्ये आढळतात. ते सर्वात लहान फ्लेमिंगो आणि त्यांची संख्या २ मिलियन पेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त संख्येत असणारी ही प्रजात आहे.

६. फ्लेमिंगोचे गुडघे मागे वाकत नाहीत!

६. फ्लेमिंगोचे गुडघे मागे वाकत नाहीत!

नीट निरीक्षण केले असता फ्लेमिंगो आपले पाय माणसासारखे वाकवतो असे दिसते. फ्लेमिंगोचे गुडघ्यासारखे दिसते,पण खरेतर ते त्याचे पाऊल आणि सांधे आहेत. फ्लेमिंगोचे जे गुडघे असतात ते पायांच्या वर पंखांनी लपविलेले असतात. जेव्हा पाय वाकतो, तेव्हा तो घोट्यातून पाय वाकलेला असतो, गुडघा नाही! त्यामुळे त्याचे गुढघे मागेही वाकतात असे जे वाटते ते सत्य नाही.

७. काही फ्लेमिंगो खडतर वातावरणात राहतात.

७. काही फ्लेमिंगो खडतर वातावरणात राहतात.

फ्लेमिंगो सामान्यत: उथळ खार्या पाण्यात किंवा खारट पाण्यांमध्ये आढळतात (जिथे खारट पाणी आणि गोड्या पाण्याचे मिश्रण). परंतु काही फ्लेमिंगो प्रजाती पाण्याचे अत्यंत क्षारयुक्त पाण्यात राहतात. असे पाणी जे खूप क्षारयुक्त असते. त्याला alkaline किंवा “सोडा” तलाव म्हणतात. या तलावांमध्ये कार्बोनेट क्षारांचे प्रमाण खूप असते. ज्यामुळे प्राण्यांची त्वचा जळते. अनेक सजीव अश्या पाण्यात राहत नाहीत. पण अश्या पाण्यातही काही फ्लेमिंगो राहतात. वैज्ञानिक अजूनही याचे कारण शोधत आहेत, की नक्की यांच्या पायावर अशी के रचना आहे की फ्लेमिंगो या क्षारयुक्त पाण्यात राहू शकतात.

८. फ्लेमिंगो आपल्या पिल्लांना दूध देतात!

८. फ्लेमिंगो आपल्या पिल्लांना दूध देतात!

हे वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. फ्लेमिंगोचे “दूध” त्याच्या क्रॉपमध्ये तयार होते (क्रॉप त्याच्या घश्याचा एक भाग) आणि नंतर ते त्याच्या तोंडातून भरवले जाते. हे कदाचित विचित्र वाटेल, पण फ्लेमिंगोचे क्रॉप दूध हे तितकेच निरोगी असते. त्यात प्रथिने आणि फॅट्स चे मुबलक प्रमाणात असतात. आणि विशेष म्हणजे हे दूध नर आणि मादी दोघेही तयार करून पिल्लांना देऊ शकतात. जोपर्यंत पिल्लं मोठी होऊन स्वतःचे अन्न खाऊ शकत नाहीत तोपर्यंत हे क्रॉप दूध त्यांना पोषण देते.

९. फ्लेमिंगो लांबवर उडू शकतात.

९. फ्लेमिंगो लांबवर उडू शकतात.

आपल्याला उथळ पाण्यात मोठ्या गटांमध्ये फ्लेमिंगो एकत्र उभे राहिलेले पाहण्याची सवय असेल. पण ते लांबवर उडतात. काही फ्लेमिंगो breeding साठी प्रवास करतात. काही हवामान बदलल्याने उबदार जागा शोधण्यासाठी उडतात. काही पाण्याच्या शोधात स्थलांतर करतात. फ्लेमिंगो लांब अंतरावर प्रवास करत असताना बहुतेकवेळ रात्रीच्या वेळी जातात, आणि दिवसा विश्रांती घेतात. त्यामुळे ते उडताना आपल्यला सहसा दिसत नाहीत

१०. फ्लेमिंगो एका पायावर झोपू शकतात.

१०. फ्लेमिंगो एका पायावर झोपू शकतात.

फ्लेमिंगो दीर्घकाळापर्यंत एका पायावर उभे राहू शकतात. अगदी झोपही काढू शकतात. परंतु, ते असं का करतात? संशोधनात असे दिसून आले आहे की फ्लेमिंगो दोन पायांवर उभे असताना त्यांची जास्त शक्ती खर्च होते त्यामुळे एका पायावर उभे राहिल्याने ती स्नायूशक्ती वाचत असावी. शास्त्रज्ञांचे असेही मत आहे की एका पायावर उभे राहिल्याने त्यांना उबदार राहण्यास मदत होऊ शकते. पक्षी शरीराची उष्णता त्यांच्या अवयवातून गमावतात. एका पायावर उभे राहून त्यांच्या शरीराची उष्णता वाचवण्यासाठी मदत होत असेल.

या सुंदर, गुलाबी रोहित म्हणजे फ्लेमिंगो पक्ष्याची माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा.