आज २७ जून. मंडळी, ८२ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी एका महान संगीतकाराचा जन्म झाला होता… हो, तेच ते. आपले लाडके पंचमदा. म्हणजेच राहुल देव बर्मन!
आर. डी. बर्मन हे नाव माहीत नसणारा माणूस विरळाच… आपल्या असंख्य सुमधुर गाण्यांनी भारतीय सिनेमाला आणि संगीताला उत्तुंग शिखरावर नेणाऱ्या आर डी बर्मन यांची आज जयंती. आर डी हे जेवढे उत्तम दर्जाच्या चालींविषयी प्रसिद्ध आहेत तेवढेच ते गाण्यांमध्ये केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांविषयी सुद्धा ओळखले जातात. अनेक वाद्ये प्रथमच भारतीय संगीतात वापरण्यामागे त्यांचेच श्रेय आहे. असं म्हणतात की जगात प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे पंचमदांची गाणी वाजतच असतात. हे भाग्य आणि लोकांचे असे प्रेम फार कमी लोकांच्या वाट्याला येते मंडळी…
तर आज आपण या अवलिया संगीतकाराच्या जयंतीनिमित्त जाणून घेणार आहोत काही खास गोष्टी ज्या नक्कीच तुमच्यासाठी नवीन असतील…

