सत्याला येऊन आज २७ वर्षं झाली. तसं पाहायला गेलं तर २७ वर्षं एवढा काळ एखाद्या सिनेमाचा 'हँगओव्हर' उतरायला खूप झाला. पण सत्याचं भूत काय उतरायचं नाव घेत नाही. बरं, ज्या जॉनरचा सिनेमा सत्या आहे, त्या जॉनरचे खूप कमी सिनेमे तयार झाले म्हणून एवढा 'सत्या फिवर' आहे असे म्हणायला सुद्धा जागा नाही. आजवर बॉलिवूडमध्ये कित्येक सिनेमे या प्रकारातले येऊन गेले आहेत.
सत्याला २७ वर्षं होऊनही आजही सत्या नवा वाटतो. कित्येकांनी त्याची पारायणं केली आहेत. काल वाढदिवस म्हणून पुन्हा एकदा लोकांनी सत्या पाहिला असेल. या लोकप्रियतेमागे कारणं पण तेवढीच भन्नाट आहेत. त्या कारणांबद्दल सत्याचा कोणताही फॅन भरभरून बोलू शकतो. आम्ही पण त्याच फॅन्स मधून एक!!! म्हणून या 'सत्या फिवर' वर थोडा प्रकाश टाकत आहोत.






