Techमंत्र : १५,००० पेक्षा कमी किंमत असलेले ६ बेस्ट स्मार्टफोन्स !!

लिस्टिकल
Techमंत्र : १५,००० पेक्षा कमी किंमत असलेले ६ बेस्ट स्मार्टफोन्स !!

मोबाईल खरेदी करण्याचा विचार करताय? तर मग त्याचे बजेटही ठरवले असेलच. बाजारात स्मार्टफोन्स अगदी तीन हजारांपासून ते लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पण जास्तीत जास्त विक्री होणारे मोबाईल्स् हे पंधरा हजाराच्या किमतीच्या आसपास असतात असे एका पाहणीतून दिसून आलंय. चला तर मग एक नजर टाकूया 15 हजार पेक्षा कमी किंमत असणाऱ्या बेस्ट स्मार्टफोन्स वर... 

1. Moto G5s Plus

1. Moto G5s Plus

मोटोरोला कंपनी आपल्या जास्त काळ टिकणाऱ्या स्मार्टफोन्स साठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला G5s Plus अजूनही बाजारात आपली लोकप्रियता राखून आहे. 13+13 मेगापिक्सल चे ड्युअल बॅक कॅमेरे आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन 4 gb रॅम, 64 gb इंटर्नल मेमरी सह येतो. सडे पाच इंची फुल एचडी स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन मेटल बॉडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर सुविधेसह एक मस्त बजेट मधील पॅकेज आहे.

2. Xiaomi Redmi Y2

2. Xiaomi Redmi Y2

शाओमी च्या Y1 मॉडेलच्या अपार सफलतेनंतर त्याच सिरीज मधले हे पुढील मॉडेल आहे. रेड मी वाय2 चा यूएसपी आहे त्याचा 16 मेगापिक्सल फ्रंट सेल्फी कॅमेरा. बॅक ड्युअल  कॅमेरा 13 आणि 5 मेगापिक्सल मध्ये येतात. याचा स्क्रीन 5.99 इंच आणि एचडी असून स्नॅपड्रॅगन प्रोसेसरची पॉवर यात आहे. 3gb/4gb रॅम आणि 32gb/64gb मेमरी या दोन पर्यायात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

3. Oppo RealMe 1

3. Oppo RealMe 1

जर तुम्ही बजेट फोन पाहत असाल आणि तुमचा रोजचा सोशल मीडियाचा वापर जास्त असेल तर हा स्टायलिश स्मार्टफोन तुम्हाला निराश करणार नाही. यात आहे 6 gb रॅम आणि 128 gb इंटर्नल मेमरी. 6 इंचाची कॅपसिटीव्ह टचस्क्रीन सोबतच 13 मेगापिक्सल बॅक आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यात दिला आहे. फेस अनलॉक सुविधा असणारा हा फोन पंधरा हजाराच्या आतील बजेट मधला उत्तम पर्याय ठरू शकतो. 

4. Honor 9N

4. Honor 9N

हा सुद्धा एक सुपर बजेट फ्रेंडली फोन असून याची विशेषता याच्या डिझाइन मध्ये आहे. दिसण्यास अतिशय उत्तम असणारा हा स्मार्टफोन फुल व्ह्यू डिस्प्ले मध्ये येतो आणि सोबतच स्क्रीन नॉच सुद्धा यावर शोभून दिसते. महत्वाचे म्हणजे यात डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ब्लु लाईट फिल्टर सुविधा दिलेली आहे. 4 gb रॅम, 128 gb मेमरी, 5.84 इंच स्क्रीन, 13+2 मेगापिक्सल ड्युअल बॅक कॅमेरा, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अश्या विशेषता असणारा हा पंधरा हजाराच्या आतील फोन नक्कीच एक आकर्षक पॅकेज आहे.

5. Samsung Galaxy J6

5. Samsung Galaxy J6

किमतीने कमी असला तरी प्रीमियम कॅटेगरी मधला वाटणारा हा उच्च दर्जाचा स्मार्टफोन! सॅमसंग कंपनी तिच्या दर्जामुळे ओळखली जातेच, आणि हा फोन ही त्याबाबतीत निराश करत नाही. 13 मेगापिक्सल कॅमेरा सोबत अनिमेटेड gif, ब्युटी फेस, बेस्ट फोटो अश्या बऱ्याच सुविधा यात दिल्या आहेत. 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 5.6 इंच सुपर अमोल्ड स्क्रीन, लेटेस्ट अँड्रॉइड ओरिओ ऑपरेटिंग सिस्टीम, 3gb रॅम, 32 gb मेमरी असणारा हा फोन तुम्हाला नक्कीच आवडेल.

6. Asus Zenfone Max Pro M1

6. Asus Zenfone Max Pro M1

असुस कंपनी आता भारतीय बाजारात चांगलीच स्थिरावली आहे. या कंपनीचे फोन दिसायला चांगले असतातच पण परफॉर्मन्स सुद्धा चांगलाच देतात. स्टायलिश बॉडी असणारा हा स्मार्टफोन येतो 13+5 मेगापिक्सल बॅक ड्युअल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह. यात आहे अँड्रॉइड 8.1 ओरिओ ऑपरेटिंग सिस्टीम, 5.99 इंच कॅपसिटीव्ह टचस्क्रीन, 3gb रॅम, 32 gb मेमरी आणि तब्बल 5000 mAH क्षमतेची बॅटरी !

 

आहेत ना हे बजेट मधले बेस्ट स्मार्टफोन्स? तुम्हाला कुठला आवडला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा…