आपले बॉलीवूडचे लोक हॉलीवूडची स्क्रिप्ट चोरतात म्हणून नेहमीच बोललं जातं. काही अर्थी ते खरंही आहेच म्हणा. चक्क शोले सुद्धा ‘The Magnificent Seven’ या हॉलीवूड फिल्म वरून उचलली आहे असं म्हटलं जातं. रामूचा सरकार तर सरळ सरळ ‘गॉडफादार’ ची कॉपीच आहे. अश्या फिल्मची भलीमोठी लिस्ट आहे राव.
पण तुम्हाला माहित आहे का, जसं आपण त्यांच कॉपी केलं तसच त्यांनीही आपलं कॉपी केलं आहे. मंडळी हॉलीवूडने सुद्धा चक्क बॉलीवूडच्या फिल्म्स कॉपी केल्या आहेत. चला तर बघुयात त्या फिल्म्स आहेत तरी कोणत्या !!









