दिनविशेष: अरूण दाते यांच्या जन्मदिनानिमित्त काही मराठी भावगीते !!

लिस्टिकल
दिनविशेष: अरूण दाते यांच्या जन्मदिनानिमित्त काही मराठी भावगीते !!

मराठी भाषेला भावगीतांचा मोठा ठेवा लाभला आहे. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटगीतांपेक्षा अशी गैरफिल्मी गाणीच ओठांवर अधिक असायची. ’मेंदीच्या पानावर’सारख्या ऑडिओ कॅसेट्सचे कित्येक भाग भावगीतांवर निघाले. 

भावगीते म्हटलं की ’शुक्रतारा मंदवारा’ किंवा ’भातुकलीच्या खेळामधली’ आठवल्याशिवाय राहावत नाही. ही गाणी गाणार्‍या अरूण दातेंचा आज जन्मदिन. ४ मे १९३५ साली जन्मलेले अरूण दाते खरेतर टेक्स्टाईल इंजिनिअर होते.  ते ’गजाननराव वाटवे पुरस्कारा’चे पहिले मानकरी होते. ६ मे २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.

आज त्यांच्या ८४व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या निवडक गीतांचा आनंद घेऊया...

१. शुक्रतारा मंदवारा

अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं हे गाणं मराठी मनामनात वसलेलं आहे.

२. भेट तुझी माझी स्मरते

हळूवार आवाजातली रोमॅंटिक गीते ही अरूण दाते यांची खासियत.

३. जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली

या गाण्यातलं हमिंग वेड लावतं. 

४. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी

अरूण दातेंच्या रोमॅंटिक गाण्यांसोबतच त्यांची दर्दभरी गाणीही तितकीच प्रसिद्ध आहेत.

५. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अरूण दातेंचं ’शुक्रतारा’ अधिक भावतं की ’भातुकलीच्या खेळामधली’ हे सांगता येणं अवघड आहे.