एका जबरा फ्यानला मिळाले ७५ हजाराचे तिकीट फुकट !!!

एका जबरा फ्यानला मिळाले ७५ हजाराचे तिकीट फुकट !!!

जस्टिन बिबर भारतात येणार. तेही आपल्या मुंबईत. या नुसत्या बातमीनं त्याचे चाहते वेडे झाले होते. मात्र त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिटाचे दर बघून अनेकांची भंबेरी उडाली.

एक तिकिटाची किंमत आहे ७५०००!!! अर्थात सर्वसामान्य माणसाला त्याचं तिकीट परवडणं हे अशक्यच.  पण ते म्हणतात ना "अगर किसी  चीज़ को दिल से  चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है"!

असंच काहीसं एका रिक्षा चालकाच्या मुलासोबत झालंय. हा २२ वर्षाचा तरुण जस्टिन बिबरचा प्रचंड मोठा फ्यान. जस्टिन बिबर भारतात येणार म्हटल्यावर त्याला भेटायची इच्छा याच्याही मनात आली.  पण खिशात इतके पैसे कुठले असायला? पण त्यानं हार न मानता कार्यक्रमाच्या आयोजकांना विनवणी केली.  आणि आश्चर्य म्हणजे आयोजकांनी या जबरा फ्यानची विनवणी कबूल केली आहे. आयोजकांनी त्याला ७५ हजार किंमतीचं तिकीट अगदी फुकटात दिलं.

तिकीट विकत घेणं शक्य नसल्यानं आम्ही या जस्टिनच्या चाहत्याला गोल्डन तिकीट मोफत देत असल्याचं आयोजकांनी म्हटलंय.

खरं तर मंडळी आपल्यासारख्या सामान्य माणसाला जस्टिन बिबर हा काय प्रकार आहे तेही तितकसं माहित नसतं.  कारण आपल्याला काय कळतंय त्या पॉप मधलं? आपण तर मंडळी अल्ताफ राजा मध्येच खुश आहोत..  नाही का ?