आता भाग घ्या भजनाच्या रिऍलिटी शो मध्ये!!!

आता भाग घ्या भजनाच्या रिऍलिटी शो मध्ये!!!

आजवर आपण गाण्याचे ‘मेरी आवाज सुनो’पासून ते ‘सारेगामा’पर्यंत अनेक रिऍलिटी शो पाहिले आहेत. पतंजलीच्या प्रॉडक्ट्सनी भारतीय बाजारपेठेवर कब्जा करणारे बाबा रामदेव घेऊन आलेत हा शो. या शोचे नावच असणार आहेत भजन रत्न !!

हा शो अर्थातच रामदेव यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्या मालकीच्या आस्था चॅनलवर होणार आहे. एका जमान्यात भजन संध्या गाजविणारे अनुप जलोटा हे या शो चे जज असणार आहेत.


झी मराठीला चिकटलेल्या तुमच्या आई-बाबा किंवा आजी-आजोबांना ही बातमी कळू देऊ नका. नाही तर तुमच्या घरचे वातावरण एकदम संस्कारी होऊन जाईल.