ओमर वॉन म्युलर (Omar Von Muller)आहे हॉलीवूडमधला एक अवलिया. तो काय करतो ठाऊक आहे? कुत्र्यांना ट्रेन करणं. ’हम आपके हैं कौन’ मधला ’टफी’ किंवा तेरी मेहरबानियॉंमधला बदला घेणारा कुत्रा, या प्राण्यांकडून अभिनय करवून घेणं अवघड असतं. नाहीतरी नर्गिस फाकरी, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल या मनुष्यप्राण्यांना तरी कुठं अभिनय येतो म्हणा! त्यातल्यात्यात कतरिना वर्षाकाठी एखादं एक्सप्रेशन द्यायला लागलीय हे आपलं नशीब.
असो, विषय चाललाय कुत्र्यांना ट्रेन करायचा. तर हे ओमर महाशय कुत्र्यांना अगदी चित्रकार म्हणूनही ट्रेन करू शकतात असं दिसतंय. त्यांच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि पाहा आणखी काही मजेदार व्हिडिओज.
