आता ’गुंडा' विसरा, येतोय नवीन धम्माल सिनेमा -MSG , द वॉरीअर लायनहार्ट

आता ’गुंडा' विसरा, येतोय नवीन धम्माल सिनेमा -MSG , द वॉरीअर लायनहार्ट

कांतीलाल शाहचा ’गुंडा’ आजवर अचाट आणि अतर्क्य या कॅटेगरीत एकदम वरच्या टोकावर होता. गेल्या आठवड्यातच ’गुंडा’ला १८ वर्षे पूर्ण झाली आणि आता ’गुंडा’च्या स्थानाला धोका तयार झालाय. 

येऊ घातलाय संत गुरमीत राम रहीम सिंग यांचा नवीन सिनेमा- MSG ,द वॉरीअर लायनहार्ट. यापूर्वी यांचे मेसेंजर ऑफ गॉडचे दोन भाग येऊन गेले आहेत. हा सिनेमा त्यावर मात करणार असं दिसतंय. कालच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि एका दिवसात तो ट्रेलर १६,७४,८०९ इतक्या वेळा पाहिला गेलाय. 

संत गुरमीत सिंग आणि त्यांच्या मुलीने बनवलेल्या या सिनेमामध्ये संत सिंगांनी एक नाही, दोन नाही, चक्क ३० वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत. ऍक्टर, पटकथाकार, गायक, डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर, मेकअप- हेअर डिझायनर, स्टंट परफॉर्मर.... नुसतं नांव घ्या, आणि ते काम या मेसेंजर ऑफ गॉड गुरमीत सिंग यांनीच केलंय. या सिनेमातले VFX बाहुबलीला लाजवतील असे आहेत.  गणपतीच्या देखाव्यातल्यासारखी  लाईटिंगने सजलेली आवकाशयानं, एलीयन्स, अश्मयुगातली माणसं हे सगळं  पाहायचं असेल, तर आताच या सिनेमातल्या टाईम ट्रॅव्हलचा आस्वाद घ्याय्चं ठरवून टाका. वरती बोनस म्हणून पिळदार मिशांचे डॉक्टर कम सीक्रेट एजंट सिंगसुद्धा पाहायला मिळतील.

 

फक्त एकच करा, सिनेमाला जाताना मोठं मित्रमंडळ सोबत घेऊन जा. तरच या सिनेमाची खरी मजा येईल.