त्याचं काय आहे, हॉटेलात जाऊन खाणं काही कुणाला चुकलं नाहीय. कधी हौस म्हणून, तर कधी दुसरा काही पर्याय नाही म्हणून, कधी ना कधी हॉटेलाची पायरी चढायलाच लागते. आणि मग समोर येतात, एकापेक्षा एक भलभलते मेन्यूज. कधी असतात हुकलेल्या इंग्रजीतले मेन्यूज, तर कधी आपल्या मायबोलीतले. इंग्रजीत तर एकेका पदार्थाचं नांव काय होईल याचा काही नेम नसतो राव! आणि जेव्हा लोक आपल्या मायच्या भाषेत मेन्यू लिहितात, तेव्हा असलं मस्त डोकं लावतात की ज्याचं नांव ते. मग ते लोक पुण्याचे असतील तर काय विचारायलाच नको.
कधी असले मेन्यू वाचून ऑर्डर दिलीये का आक्कांनो आणि भावांनो?? चला बघा, आणि सांगा यातले कुठे मेन्यू तुमच्या नजरेखालनं गेलेत ते!!









