सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. तरुण पब्लिकने टीव्ही केव्हाच बाजूला केला आहे. अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन देशविदेशातील अफलातून सिरीज, सिनेमे पाहून आपली जनता पण ग्लोबल होतेय. पण काय आहे, हे सगळे चॅनेल्स फुकट पण येत नाहीत ना राव!!
हे जरी असलं तरी गेम ऑफ थ्रोन्सने लोकांना किमान दीड महिन्यासाठी का होईना हॉटस्टार घ्यायला लावलं. त्यातच गेल्या काही काळात आलेल्या सेक्रेड गेम्स, स्ट्रेंजर थिंग्स यांच्यासारख्या सिरीजने लोकांना नेटफ्लिक्स वेबसिरीजकडेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले आहे राव!! नेटफ्लिक्स पहिल्या महिन्याला फ्री मध्ये चालते हे तुम्हाला माहीत असेलच. पण नंतरचे प्लॅन्स काही स्वस्त नाहीत हो. आणि हेच तर दुखणे आहे राव!! भारी भारी सिनेमे, सीरिज तर पाहायच्या आहेत पण खिशाला एवढी कात्री लावायची ईच्छा पण होत नाही. अशा गोंधळात अडकलेल्या लोकांसाठी नेटफ्लिक्स भन्नाट प्लॅन घेऊन आली आहे राव!!
नेटफ्लिक्सने दरमहा १९९रुपये वाला एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने या प्लॅनचे नाव ग- मोबाईल ठेवले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त SD क्वालिटीचे व्हिडीओ पाहायला मिळणार आहेत. आणि या प्लॅनचा वापर फक्त एका स्क्रीन करता येणार आहे राव!! या १९९रुपये वाल्या प्लॅनचा वापर करत असताना याला तुम्ही TV वर कास्ट नाही करू शकत.

