मायकल जॅक्सनने जगाचा निरोप घेतला त्याला आज ११ वर्षे झाली, पण आजही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. पॉप कल्चरचा अनभिषिक्त सम्राट म्हणूनच जग आजही त्याला ओळखतं. मृत्यूनंतरसुद्धा त्याचे अल्बमस प्रचंड विकले जातात. आजही वर्षाला त्याची कमाई ही जवळपास १० अब्ज रुपये आहे. यावरून त्याच्या लोकप्रियतेची प्रचिती यावी. लोकांमध्ये प्रचंड कुतूहल असलेला हा रॉकस्टार अनेकार्थाने एक रहस्य होता. आज आम्ही अशाच काही त्याच्या जगाला माहीत नसणाऱ्या गोष्टी सांगणार आहोत.
मायकल जॅक्सनबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी !!
लिस्टिकल


१.. मायकल जॅक्सन देवावर प्रचंड श्रद्धा असणारा माणूस होता. तो त्याच्या प्रत्येक शोच्या आधी प्रार्थना करायचा. तसेच त्याला एखादा पुरस्कार मिळाला की न चुकता देवाचे आभार मानायचा.

२. आपले आयुष्य वाढावे आणि आपण नेहमी तरुण रहावे यासाठी तो किती सर्जरिज करायच्या हे सर्वांना माहीत आहे. पण तो एकदा आयुष्य वाढविण्यासाठी हायपरबेरीक ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपला होता.

३. अनेकांना त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्स सुरू असताना जास्त पुढे वाकून डान्स करण्याचे अप्रूप वाटते. पण त्यासाठी तो अँटी ग्राव्हिटी बूट वापरत असे.

४. ११ सप्टेंबर २००१ साली त्याची वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एक मिटिंग होती. पण काही कारणाने त्याला ती मिटिंग कॅन्सल करावी लागली होती. आणि त्याच दिवशी ती बिल्डिंग दहशतवाद्यांनी उडवून दिली होती. दैवामुळेच त्यादिवशी तो वाचला.

५. त्याच्या बलात्काराला बळी पडलेल्या एका माणसाने सांगितल्याप्रमाणे तो अलार्म लावून सेक्स करत असे.

६. त्याच्या अंतिम यात्रेचे लाईव्ह ब्रॉडकास्ट २.५ अब्ज लोकांनी पाहिले होते. आजवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहिले गेलेले हे एकमेव ब्रॉडकास्ट आहे.

७. ज्यादिवशी मायकल जॅक्सन वारला त्यादिवसी विकिपीडिया, ट्विटर आणि त्यावेळचे प्रसिद्ध इन्स्टंट मॅसेंजर सगळे क्रॅश झाले होते. एवढे प्रचंड लोक त्याला सर्च करत होते.

८. २००२ साली चक्क त्याने आपल्याच मुलाला घराच्या बाल्कनीत लटकवून दिले होते.

९. त्याला अल्फा-1 अँटीट्रिपसीन डेफिसीयन्सी नावाचा दुर्मिळ आजार होता. हा त्याचा आजार आनुवंशिक होता.

१०. १९८० साली त्याचा Mr. T नावाचा एक बॉडीगार्ड होता. तो एका रात्रीच्या सेवेचे तब्बल 3 हजार डॉलर्स घेत असे.

११. त्याचा आजवर सर्वाधिक विक्री झालेला अल्बम हा थ्रिलर आहे. त्याची ४.2 कोटींहून अधिक विक्री झालेली आहे.

१२. मायकल जॅक्सनच्या बाथरूममध्ये लहान मुलांचे नग्न फोटो सापडले होते. त्यावरून त्याला चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्यसन असावे असा कयास आहे.

१३. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात त्याची कित्येक अप्रदर्शीत गाणे सापडले होते. त्यापैकी फक्त दहा गाण्यांसाठी सोनी कंपनीने २५० मिलियन डॉलर ऍडव्हान्स दिले होते.

१४. एवढ्या श्रीमंत माणूस असून देखील त्याच्यावर एका लायब्ररीची १० लाख उधारी होती.
