जुन्या हिंदी सेनेमातल्या व्हिलनचं बेसिक क्वालिफिकेशन काय ? तर छानपैकी चार पाच खून करता आले पाहिजे, जगात असेल नसेल तो सगळा हलकटपणा अंगी असायला हवा, ऐटदार डायलॉग आले पाहिजे, पुढे रणजीत आणि शक्ती कपूरच्या जमान्यात तर रेप शिवाय तो व्हिलन वाटतच नसे. असो...
सगळ्या टिपिकल व्हिलन मध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल ती म्हणजे व्हिलन क्रूर दिसावा म्हणून त्याचा एक डोळा नेहमी पट्टीने झाकलेला असायचा. या पाठच लॉजिक म्हणजे त्याचा तो डोळा काही करणास्तव फुटलेला असायचा किंवा हिरोनेच कधी काळी तो फोडलेला असायचा. पण ही कल्पना आली तरी कुठून ? खरच फक्त डोळा फुटलाय म्हणून लावण्यासाठी असते का ही पट्टी ?
या पट्टीमागचं सत्य !
तर असं आहे मंडळी, समुद्रतील लुटारू (चाचे) हे अश्या प्रकारची पट्टी अंधारात नीट दिसावं म्हणून वापरत. या लुटारूंना नेहमी अंधाऱ्या तळघरात ये जा करावी लागे. तळघरात मिट्ट काळोख असल्याने समोरचं काही दिसणं कठीणच. अश्यावेळी हे लुटारू आधीच आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधून ठेवत मग जेव्हा अंधाऱ्या तळघरात जायची वेळ येई तेव्हा तीच पट्टी उघड्या डोळ्यांवर सरकवून बंद डोळा उघडत. याने व्हायचं असं की बंद डोळा आधीच बाहेरच्या प्रकाशापासून दूर असल्याने जेव्हा अंधारात उघडला जायचा तेव्हा या डोळ्याने दुसऱ्या उघड्या डोळ्या पेक्षा जास्त स्पष्ट दिसायचं.
साधारणपणे जेव्हा आपण लख्ख प्रकाशातून अंधारात जातो तेव्हा अंधारातलं नीट दिसायला जवळपास २५ मिनिटे लागतात. याचं कारण म्हणजे आपले डोळे अंधारात स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो. याचा अनुभव तुम्ही रात्री नक्कीच घेतला असेल किंवा अचानक घरातली लाईट गेल्यावर असाच अनुभव येतो.
शेवटी असं आहे की हिंदी सिनेमाचा आणि या लॉजिकचा काहीही संबंध नाही राव पण तरी तो खतरनाक व्हिलन बघत असताना आजही भारीच वाटतं !!

