या वीकेंडला 2 मराठी आणि 3 हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मग तुम्ही यांतला कोणता सिनेमा पाहणार?
१४ ऑक्टोबर : आज रिलीज होणारे सिनेमे ; तुमची पसंती कोणत्या सिनेमाला?

घंटा
बरीच चर्चा असलेला 'घंटा' हा चित्रपट आज रिलीज होत आहे. कॉलेज संपवून सट्टेबाजीच्या वाईट मार्गाला लागलेल्या तीन मित्रांची बिकट अवस्था यात प्रबोधनात्मक रीतीने दाखवली गेलीय. चित्रपटात अमेय वाघ, भाऊ कदम, पुष्कर श्रोत्री, शिवानी सुर्वे, अनुजा साठे असे काही चेहरे दिसतील. फ्रेश चेहरे आणि काहीशी वेगळी कथा हा या सिनेमाचा यूएसपी आहे.
प्रेम संकट
आज प्रेम संकट हा मराठी चित्रपटसुद्धा प्रदर्शित होतोय. दत्ता मिरकुटेंची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या रोमँटिक चित्रपटातून राज सुरवाडे हा नवोदित अभिनेता पदार्पण करत आहे तर नायिकेच्या भूमिकेत मोनालिसा बागल आहे. प्रेमात येणारा संघर्ष, त्याग, दुरावे, वेदना हे सगळं काही या चित्रपटातून बघायला मिळेल. ट्रेलर पाहून सिनेमा काही वेगळं देतोय असं मात्र काही वाटत नाही.
अण्णा : किसन बाबुराव हजारे
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या जीवनावरील हा बर्याच दिवसांपासून चर्चेत असलेला चरित्रपट आज प्रदर्शित होतोय. अहिंसेच्या मार्गाने क्रांती घडवणार्या अण्णांचा जीवनप्रवास पडद्यावर पाहाण्याची ही संधी दवडू नका. दिग्दर्शन आणि कथा शशांक उदापूरकर यांची आहे आणि ते स्वतःच अण्णांच्या भूमिकेत आहेत.
बेईमान लव्ह
सनी लियोनचा लीड रोल असलेल्या या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे ते सनीच्या बोल्ड लूक मुळे. सनीबरोबर या चित्रपटात तीचा पती डॅनियल वेबर आणि अभिनेता राजेश दुग्गल काम करत आहेत. 'डार्क रोमान्स' सारखा विषय असल्याने चित्रपटात सनीचा या चित्रपटात मोठा बोलबाला असेल यात शंका नाही! तसंही सनीच्या सिनेमात बघायला आणखी दुसरं काय असतं?
सात उचक्के
हा एक फुल्ल टू कॉमेडी चित्रपट आहे. अनुपम खेर, मनोज वाजपेयी, के. के. मेनन, अन्नु कपूर अशी नावाजलेली मंडळी या चित्रपटातून दिसतील. जर तुम्हाला निखळ विनोद आणि उत्कृष्ट अभिनयाचा आनंद लुटायचा असेल तर या सात उचक्क्यांना भेटायला नक्कीच जा.
फुद्दू
सुनील सुब्रमणी यांनी डिरेक्ट केलेला हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट. शुभम आणि स्वाती कपूर यांचा लीड रोल आहे आणि सोबत स्पेशल अपियरन्स म्हणून या चित्रपटातील एक गाणे सनी लियोनवर चित्रीत झालय जे रणबीर आणि कॅटरीना या जोडीने गायलं आहे.