नवऱ्याला बायकोबद्दल आणि बायकोला नवऱ्याबद्दल तक्रार नाही, असं जोडपं काही कुठं सापडायचं नाही. मग नवरेलोक बायकांवर विनोद करतात आणि एकमेकांना फॉरवर्ड करतात आणि काही खिलाडूवृत्तीच्या बायका त्या जोक्सना हाणून पाडत शेरास सव्वाशेर होतात.
परवाच आमच्याकडे एक व्हिडिओ फिरत फिरत आला आणि त्यात एक बाई एकदम खणखणीत आवाजात बैलपोळ्याच्या निमित्तानं "सुखकर्ता दुखहर्ता"च्या चालीवर आपल्या नवऱ्याचीच आरती करत होत्या.. पाहाच मग आरती...
काय म्हणता, तुमच्याकडं रिलायन्स फोर जीचं कार्ड नाही? हरकत नाही.. आरती ऐकता आली नाही तर मग इथं वाचायला नक्कीच मिळेल..
सुखकर्ता दु:खहर्ता मरता तिसरीवर
तुमच्यासारखा दुसरा नाही पृथ्वीवर..
जय देव जय देव जय पतीदेवा, तुमच्या अवगुणांची गाऊ किती गाथा.. जयदेव जयदेव||
झणझणीत चमचमीत खाण्याचा ध्यास,
वासाशिवाय उतरत नाही घास,
निगुतीने रांधून तुम्हां वाढता,
शेजारणीचे तुम्ही नांव काढता..
जय देव जय देव जय पतीदेवा, तुमच्या अवगुणांची गाऊ किती गाथा.. जयदेव जयदेव||
आंघोळीचा तुम्हां भलताच त्रास,
परफ्यूमचा सर्वांगी दरवळतो वास,
ऑफिसात कान पिळतो हो बॉस,
घरी मात्र सर्वाधीशाचा भास..
जय देव जय देव जय पतीदेवा, तुमच्या अवगुणांची गाऊ किती गाथा.. जयदेव जयदेव||
सासरच्यांची तुम्ही मर्जी राखता,
माझ्या माहेरचा उद्धार करता,
गाऊन गाऊन तोंड दुखले,
आता आणखी काय उणे राहिले?
माझी मी म्हणून राहिले टिकून,
दुसरीतिसरी गेली असती पळून..
जय देव जय देव जय पतीदेवा, तुमच्या अवगुणांची गाऊ किती गाथा.. जयदेव जयदेव||