एखाद्या पेंटिंगमध्ये अनेक रहस्यं असू शकतात. असं म्हटलं रे म्हटलं की लोकांच्या डोक्यात मोनालीसा तरळून जाते. पण पेंटिंगमध्ये जे दिसते त्याव्यतिरिक्तही बरंच काही असू शकते. मात्र यासाठी तो कलाकारही तितक्याच ताकदीचा असायला हवा. पेंटिंगमध्ये दृष्टीभ्रमही लपलेले असू शकतात. आज असेच एका पेंटिंगधील ऑप्टिकल इल्युजन सोडवून पाहू.
फोटोत दिसणारे हे पेंटिंग बराच वेळ डोके खाजवायला लावू शकते. तल्लख बुद्धी असेल तर हे काम लवकरही होईल म्हणा. या निमित्ताने तुमच्या निरीक्षणशक्तीचाही अंदाज घेता येईल. या पेंटिंगमध्ये असलेले एक अस्वल फक्त शोधायचे आहे. शोधा म्हणजे सापडेल या म्हणीप्रमाणे इथे काम करावे लागेल.
या पेंटिंगमध्ये एक शिकारी दिसत आहे. हातात बंदूक घेऊन तो गुडघ्यावर बसला आहे. तो ज्या पद्धतीने दबा धरून बसला आहे, त्यावरून तो शिकार शोधत आहे हे कळून येईल. तर त्याच्या आजूबाजूला बर्फाळ जंगल दिसत आहे. हे पेंटिंग प्लेबझकडून शेयर करण्यात आलं आहे.

