मुळचे भारतातील नसूनही भारतीय मातीत सामावून गेलेले असे हे ‘पारसी’. मूळचे इराणचे पण त्यांना स्वतःचाच देश सोडून पळावं लागलं. त्यातल्या काहींनी भारतात आश्रय घेतला आणि इथेच कायमचे राहिले. या समाजात असलेला मनमिळावूपणा क्वचितच इतरांमध्ये दिसून येतो.
त्यांच्या अनोख्या जीवनशैलीवरुन त्याचं चित्रण बॉलीवूडमध्येही झालं. आपल्या गाडीवर नित्तांत प्रेम करणारा, हुशार आणि भाषेचा वेगळा लहेजा असणारा असं त्यांचं पात्र. तुम्हाला मुन्नाभाई एम.बी.बी.एस मधला ‘रुस्तम पावरी’ आठवत असेल जो मुन्नाभाईला कॉपी करण्यास मदत करतो. शिवाय गेल्याच वर्षी आलेला अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ हा सिनेमा.
मंडळी आज पतेती, पारसी नववर्ष. त्यानिमित्ताने बघूया बॉलीवूडमध्ये सादर झालेले काही पारसी पात्रं मध्यवर्ती भूमिकेत असलेले काही सिनेमे....










