या निळा तुरा असलेल्या देखण्या पक्षाचं कौतुक असतं ते त्यानं नाचावं म्हणून. मोराला आपण सहसा उडताना पाहात नाही. भरारी घेताना तर नाहीच नाही. त्याचा तो मोठाला पिसारा घेऊन कुठे आणि कसं उडावं बिचार्याने?
परवा मोराच्या उडण्याचा व्हिडिओ कुणीतरी फेसबुकावर शेअर केला आणि आता बर्याचशा लोकांच्या फेसबुक-भिंतीवर दिसतोय. पाहा बरं हा पक्षी उडतानाही तितकाच सुंदर दिसतोय की नाही ते!!
