पुन्हा एकदा रामायण...वाचा कोण तयार करत आहे !!!

पुन्हा एकदा रामायण...वाचा कोण तयार करत आहे !!!

बाहुबली हिट झाल्यावर पौराणिक कथांची रांगच लागली आहे. हा सुद्धा एक नवीन ट्रेंडच आहे मंडळी. महिनाभरापूर्वी अरबपती बी. आर. शेट्टी १००० करोडच्या बजेटवर महाभारत साकारणार आहे अशी बातमी आली होती आणि आता नवीनच बातमी उगवली आहे की रामायण देखील पुन्हा एकदा भव्यदिव्य रुपात आपल्या भेटीला येणार आहे आणि बजेट आहे तब्बल ५०० कोटी !

३ दिग्दर्शक, ३ भागात रामायणाची कथा सांगणार आहेत. अल्लू अरविंद, नमित मल्होत्रा, मधु मंतेना अशी दिग्दर्शकांची फळी यावर काम करत आहे. हा सिनेमा हिंदी, तेलगु आणि तमिळ मध्ये प्रदर्शित होणार असून 3D फॉरमॅट मध्ये देखील असेल. 

१९६१ साली रामायणावर पहिला सिनेमा आला तो म्हणजे 'संपूर्ण रामायण' त्यानंतर रामानंद सागर यांची आलेली ऐतिहासिक सिरीयल 'रामायण' आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल पण त्यानंतर रामायण कित्येकदा छोट्या मोठ्या पडद्यावर येऊन सुद्धा ती मजा आली नाही. आता येवू घातलेला नवीन रूपातील रामायण आपली अपेक्षा पूर्ण करेल का ते पाहावं लागेल.