१० महिन्यांच्या स्पर्धेनंतर प्रसिद्ध सिंगिंग रियालिटी शो “सा रे गा मा पा लिटील चॅम्पस”चा विजेता घोषित करण्यात आला आहे. आणि.....
‘सा रे गा मा पा’ च्या इतिहासात पहिल्यांदाच चक्क दोघांना विजेता म्हणून घोषित करण्यात आलं आहे. .
जयपूर, राजस्थानच्या धर्तीवर अंतिम सोहळा पार पडला. स्पर्धेचा विजेता घोषित करताना लक्षात आलं की महाराष्ट्राची अंजली गायकवाड आणि बंगालचा श्रेयान भट्टाचार्य यांच्यात टाय झाला आहे. सहसा टाय झाल्यानंतरही एकाच विजेता घोषित केला जातो पण यावेळी आगळा वेगळा निर्णय घेत पहिल्यांदाच बक्षीस वाटून देण्यात आलं आहे.
यावेळी शो चे जज हिमेश रेशमिया, जावेद अली आणि नेहा कक्कड बरोबरच आपली फिल्म फिरंगीच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा देखील हजर होता.
अंजली आणि श्रेयानला बोभाटा तर्फे खूप खूप शुभेच्छा !!!

