आजकाल मोदींचा नोटा बदलीचा निर्णय आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास या सगळ्या गोष्टी चर्चेत असतानाच सोशल मिडीयावर चर्चा रंगलीय ती सोनमच्या बेवफाईची. नेमकं काय आहे हे सोनम गुप्ता प्रकरण...?
सद्या तुम्हाला प्रत्येकजण नव्या २०००च्या नोटेसोबतची आपली सेल्फी शेअर करताना दिसतोय. पण अशातच एका दहाच्या नोटेचा फोटोही वायरल झाला ज्यावर कोणीतरी पेनने लिहिलंय, "सोनम गुप्ता बेवफा है." आता ही बेवफा सोनम गुप्ता कोण आहे हेही कोणाला माहित नाही आणि तिच्या बेवफाईचा अशा पद्धतीने बदला घेणारा तिचा दिलजला आशिक कोण आहे हेही कोणाला माहीत नाही.
पण सोनमची ही बेवफाई आता १०,१००,२०००च्या नोटांसोबत विदेशी नोटांवर सुद्धा दिसायला लागलीय. त्यामुळे सोनम आता इंटरनॅशनल बेवफा बनलीय. आणि गंमत म्हणजे या सोनमनेही १००च्या नोटेवर मान्य केलंय. "हॉं, हूँ मे बेवफा!!"




