ही एका बकऱ्याची गोष्ट आहे ज्याचे लहानपणापासून लाडच लाड झाले होते.
त्याचा मालक त्याला अगदी शेलक्या चिजवस्तूंचा खुराक खायला घालायचा.
बकऱ्याचे आयुष्य अगदी मज्जेत चालले होते.
मालकांनी लाड करावेत आणि आपण ते यथेच्छ भोगावे हेच आपले आयुष्य आहे असे बकऱ्याला वाटायला लागले.
वाटायला लागले काय ,त्याच्या मनाची खात्रीच पटली की हे असेच आहे !!!
मग एक दिवस तर कमालच झाली.
शेतकऱ्याने सक्काळी सक्काळी त्याला चक्क आंघोळ घातली. कपाळावर लाल कुंकू लावलं, गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार घातला.
गाडीतून वाजतगाजत देवळात घेऊन गेला.
बकऱ्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
आणि थोड्याच वेळात त्याच्या मानेवरून सुरी फिरवण्यात आली.
सांगायची गोष्ट अशी की आयुष्यात काहीही गृहीत धरू नका.
गळ्यावरून सुरी कधी फिरेल हे सांगता येत नाही.
