२९ एप्रिलला सैराट आला आणि आता एक वर्षांनी पुन्हा आकाश ठोसरचा नवा सिनेमा येतोय. ‘एफयू’ (फ्रेन्डशिप अनलिमिटेड’)!!!
महेश मांजरेकर आकाश ठोसरला पुन्हा एकदा लाँच करतायत.. पण नव्या रुपात. सैराटमधला गावरान परश्या मुंबईच्या ढिंच्याक मुलाच्या रुपात फिट बसेल का अशी शंका आहेच. पण सिनेमात तो एकटा नाहीये. त्याच्याबरोबर सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, मयुरेश पेम, बोमन इराणी, शरद पोंक्षे आणि स्वतः महेश मांजरेकर अशी तालेवार मंडळी आहेच. यामुळे सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.
आता हि भट्टी जमते कि बिघडते हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. पण तूर्तास टीझर बघा आणि टीझर कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा!!!
