अंकल स्क्रूज परत येत आहेत, डिस्ने घेऊन आलंय डकटेल्सचं टीझर..

अंकल स्क्रूज परत येत आहेत, डिस्ने घेऊन आलंय डकटेल्सचं टीझर..

 अंकल स्क्रूज परत येणार ही बातमी आम्ही तुम्हांला जुलैमध्येच दिली होती भाऊ...  तर आता डिस्नेनं या बातमीवर शिक्कामोर्तब सुद्धा केलंय. २०१७ च्या उन्हाळ्यात डकटेल्स परत येतंय. त्याचा टिझर पण आलाय.  बघा बरं पटापट...

तर मंडळी, जुनी सगळी टीम परत येतेय.  जायरो, लॉन्च पॅड असे सगळेच कॅरेक्टर परत येतायत.  पण डिस्नेने गंमत केलीय, ऍनिमेशनचं तंत्रज्ञान खूप पुढं गेलं असलं तरीही या मालिकंचं काम हातांनी काढलेल्या चित्रांनीच होणार आहे. या मालिकेत  अर्ध्यातासाचे २१ भाग आणि  एक तासाचे दोन भाग असणार आहेत. तर मंडळी, तयार व्हा तुम्ही पण डकटेल्सच्या सफरीला...

जाताजाता-आमच्या खास सूत्रांनी माहिती दिली आहे की अंकल स्क्रूजला पण नाणेबंदीला सामोरे जावे लागणार आहे....