आपल्या आयुष्यात कंप्यूटर आणि मोबाईलचे स्थान अढळ आहे. टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुद्धिबळासारख्या बुद्धिमतेच्या खेळात कंप्यूटरने मानवाला हरवणे हे घडूनही बराच काळ गेलाय. पण कलाक्षेत्र किंवा क्रिएटीव्हीटीच्या बाबतीत माणसासारखा विचार तंत्रज्ञानाला करणे शक्य नाही अशा समजात आपण जगतो. पण आता अशी एक शॉर्टफिल्म आली आहे जिची पूर्ण स्क्रिप्ट च AI (Artificial Intelligence) ने लिहली आहे. बरेचदा आपल्याला आर्ट सिनेमे कळत नाहीत पण आता पूर्णतः कंप्यूटर ने लिहिलेली फिल्म आपल्याला समजेल?
तर बघा ही शॉर्टफिल्म जी संपूर्णतः एका कंप्यूटर अल्गोरिथमने लिहिलेली आहे आणि सांगा आम्हाला तुमचे त्याबद्दलचे मत.
