शौचालय ही माणसाची एक नितांत गरज आहे. पण, आजही भारतात शौचालय वापरण्यासंबधी जनजागृती करावी लागते. स्वच्छ परिसर आणि निरोगी आरोग्यासाठी घरोघरी शौचालय हे हवेच. शौचालय वापरण्याची सुरूवात कधीपासून झाली असेल? याचा शोध नेमका कधीपासून लागला असेल? पूर्वीची शौचालये आणि आजची शौचालये यामध्ये काळाच्या ओघात यातही काही बदल झाले असतील का? यासारख्या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा लेख नक्की वाचा.
शौचालयातील बदल पाहण्याआधी थोडा याचा इतिहास पाहू. भारतात हडप्पा कालीन संस्कृतीपासून शौचालये वापरली जात. म्हणजे इ. स. पूर्व २५०० वर्षापूर्वी आपण शौचालयाचा वापर करण्याइतपत जागरूक होतो. हडप्पा संस्कृती लयाला गेल्यानंतर कदाचित याचा वापर बंद झाला असावा. लोथलमध्ये हडप्पा संस्कृतीचे जे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये शौचालयेही पाहण्यात आली आहेत. ही शौचालये विटा आणि चिकणमातीपासून बनवलेली होती. यात एक मुख्य भोक आणि सगळा मैला साठण्यासाठी एक चेंबर होते. यावरून हे दिसते की भारतात तरी शौचालयाची परंपरा फार फार वर्षापासूनची आहे.
त्यानंतर मुघल काळातही (इ.स.१५५६) शौचालये वापरली जात होती. मात्र त्यांचा वापर फक्त श्रीमंत वर्गापुरताच मर्यादित होता. त्याच काळात सार्वजनिक शौचालयाचेही प्रयोग करण्यात आले, पण ते अपयशी ठरले. युरोपात १५ व्या शतकात थॉमस ब्राईटफिल्डने पहिल्यांदा फ्लशिंग टॉयलेटचा शोध लावला.
इतर देशातही शौचालयाच्या आकार आणि प्रकारात असेच बदल होत गेलेले दिसतील. बघूया विविध देशातील शौचालयांचे काही प्रकार. यातील काही शौचालयात तर पाण्याचा वापरही करता येत नसे. तर काहीचा आकार तर उघड्यावर बसल्यासारखाच होता.

















