माणूस पैसे ज्या कारणांसाठी कमावतो त्यापैकी एक म्हणजे आवडते खाद्यपदार्थ खायला मिळणे. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की खाण्यासाठीच तुम्हाला पैसे दिले जातील तर तुम्हाला किती आनंद होईल नाही का? तर ही संधी खरोखर चालून आली आहे.
आजवर तुम्ही अनेक मोठ्या थाळी किंवा प्लेट संपवून दाखवणाऱ्या लोकांना 'असे' बक्षीस अशी जाहिरात वाचली असेल. दिल्ली येथील मॉडेल टाऊन येथील एका स्टॉलद्वारे अप्रतिम ऑफर देण्यात आली आहे. त्यांच्या स्टॉलवरील प्रसिद्ध काठी रोल त्यांनी १० किलो वजनाचा बनवला आहे आणि जो कोणी हा रोल २० मिनिटांत खाऊन दाखवेल त्याला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

