आजवर तुम्ही प्राण्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से ऐकले असतील. यातले अधिकांश किस्से कुत्रे किंवा मांजरांशी संबंधित असतात. पण वोजतेक नावाच्या एका अस्वलाच्या दिलदारपणाची गोष्ट मात्र अधिक रंजक आहे. त्याने केलेले कामही काही साधेसुधे नव्हते. दुसऱ्या महायुद्धात हे अस्वल पोलंड देशाच्या सैनिकांबरोबर खांद्याला खांदा लावून लढले होता.
इतर देशांसाठी ते फक्त एक अस्वल असेल, मात्र पोलिश सैनिकांसाठी ते आपला एक आर्मी सहकारी होते. एका सैनिकाप्रमाणे या वोजतेकला सर्व गोष्टी देण्यात आल्या होत्या. पगाराऐवजी त्याला खाणे पिणे पुरवले जात असे. एवढेच नव्हे, तर त्याला लष्करात एक रँकही देण्यात आली होती.



