नुसतं कौशल्य असून भागत नाही. आजकाल सगळ्यांना काही ना काही वेगळं करायचं असतं, रेकॉर्ड्स करायचे असतात. केरळच्या एका १६ वर्षांच्या मुलीनेही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. एवढ्या कमी वयात तिचे नाव पूर्ण जगभर पोहोचले आहे. तिची कामगिरी पण तितकीच दखल घेण्याजोगी आहे. १२० भाषांमधील १२० गाणी सलग ७ तास २० मिनिटे म्हणण्याचा विक्रम तिने केला आहे.
सुचेता सतीश असे या विक्रम केलेल्या मुलीचे नाव आहे. दुबई येथे १९ ऑगस्ट येथे 'म्युझिक बियाँड बॉर्डर्स' हा शो झाला. यापूर्वी एका भारतीयाने हा विक्रम केला होता. केसीराजु श्रीनिवास यांनी २००८ साली ७६ भाषांमध्ये गाणी गायली होती. सुचेताने केसीराजूंचा विक्रम मोडला आहे.

