२०१७ आता संपत आलेला आहे. हीच वेळ आहे जेव्हा गेल्या वर्षभरात काय काय झालं याचा लेखाजोखा आपण घेऊ शकतो. तर, आता २०१७ च्या गोष्टी थोड्या ‘रिवाइंड’ करूयात. मंडळी, रिवाइंडवरून आठवलं, युट्युबने ‘युट्युब रिवाइंड’ नावाने एक व्हिडीओ सिरीज सुरु केली आहे. यामधून युट्युबने २०१७ चे टॉप व्हिडीओज समोर आणले आहेत. मंडळी, त्यात त्यांनी भारतीय व्हिडीओजचा देखील एक सेक्शन केलाय ज्यात आपल्याला भारतात गाजलेले टॉप व्हिडीओ बघायला मिळतायत!!
राव, सध्या युट्युबची चालती आहे. त्यामुळे ‘युट्युबवरील व्हायरल व्हिडीओला उधाण आलंय. पण या लाखो व्हिडीओजमधून टॉप १० मध्ये जागा मिळवणारे फक्त काहीच दर्जेदार व्हिडीओज आहेत. चला, तर आज बघूयात हे १० भारतीय टॉप व्हिडीओज आहेत तरी कोणते?
