वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात राव. उपाशी राहतात, कमी जेवतात, अमुक खातात, तमुक खातात. काहीवेळा वजन खूप जास्त असेल तर ऑपरेशन देखील करतात. नुकतंच शोभाबाईंच्या टोमण्याला (पॉझिटिव्हली) मनावर घेऊन दौलतराम जोगावत या पोलिसाने तब्बल ६५ किलो वजन कमी केलं. अशी उदाहरणं अनेक मिळतील राव. हल्ली स्लिम ट्रीम राहण्याचं फॅडच आलंय...
मंडळी आजच्या काळात वजन कमी करण्याचे वैज्ञानिक उपाय आले असले तरी एक काळ असा होता जेव्हा असे अद्यावत उपाय नव्हते. मग त्याकाळात माणसांनी काय केलं असावं ? त्याकाळातील जुगाड बघून तुम्हाला धक्का बसेल राव.
चला आज पाहूयात वजन कमी करण्यासाठी इतिहासातील १० अघोरी पद्धती....










