कोरोनाची जे काही लक्षणे सांगितली गेली, त्यापैकी एक म्हणजे चव जाणे! म्हणजेच कोरोना झाल्यावर जिभेची चव जाण्याची पूर्ण शक्यता असते. अर्थात प्रत्येक कोरोना रुग्णाची चव जातेच असेही नाही. पण कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर रुग्णांना जिभेला चव जाणवते का असा प्रश्न विचारण्यात येतो. जिभेला काहीच न जाणवणं किती प्रमाणात असू शकतं याचं प्रात्यक्षिक एका टिकटॉकरने नुकतंच दाखवलं आहे.
रसेल डॉनली असे या टिकटॉकरचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तो कोरोना पॉजिटीव्ह असल्याचं समजलं होतं. त्याचबरोबर त्याच्या जिभेला चव जाणवणं पूर्ण बंद झालं होतं. कोरोना झाल्यामुळे तो आयसोलेशनमध्ये होता. यावेळी त्याने काही व्हिडीओज शेअर केले. या व्हिडीओमध्ये तो जिभेला चरचरीत लागतील असे पदार्थ खाताना दिसत असे. पण जिभेला चव जाणवत नसल्यामुळे त्याच्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाहीय.

