सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर उचकी लागणे म्हणजे विशिष्ट परिस्थितीला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद उर्फ रिप्लाय. ही परिस्थिती म्हणजे जठरात आम्लाचे (अॅसिड) प्रमाण वाढणे, विषकारक पदार्थांची निर्मिती होणे किंवा अशाच प्रकारची असामान्य परिस्थिती निर्माण होणे. यामुळे होतं काय तर, छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते व हवा फुफ्फुसात जाण्यास अडथळा निर्माण होतो. यावेळी जो विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो त्याला उचकी म्हणतात.
उचकी ही सर्वसाधारण आहे. कधीकधी ती सतत येत राहते. साधारणपणे ४ किंवा ५ वेळा उचकी येऊ शकते. पण काही वेळा ती एका मिनिटात ३० पेक्षा जास्त वेळा सुद्धा लागू शकते. उचकी जर महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असेल तर त्याला अडेलतट्टू उचकी म्हणतात.
चला तर आता वळूयात उचकीच्या उपायांकडे