मला सकाळी कसंसच होतं- आजकाल ना सकाळ्ळपासून माझ्या पोटात ढवळून येतं अशा तक्रारी घरातली सूनबाई करते तेव्हा काळजीसोबत घरात आनंदाचे वातावरणही पसरते. थोडक्यात पुढच्या पिढीची चाहूल घराला लागते. डोहाळ्यांची ही सुरुवात 'मॉर्निंग सिकनेस' या नावानेही ओळखली जाते. पण १९५०-६० च्या दरम्यान पाश्चात्य जगातील अनेक देशात बर्याच घरांच्या आनंदावर एक दु:खाची सावली पडली. त्या काळात जन्माला येणारी हजारो बाळे अनेक व्यंगासकट जन्माला यायला लागली.कोणाला हात नाहीत तर कोणाला पाय नाहीत.काहीवेळा दोन बाळं एकमेकांना चिकटून जन्माला आली.बरीचशी बाळं अर्थातच जास्त जगली नाहीत.जी जगली ती फारच कष्टाने आणि अल्पवयात गेलीही !
अर्थातच त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासह चर्चा सुरु झाल्या आणि थोड्याच दिवसात असं लक्षात आलं की सकाळच्या उलट्यांचा त्रास कमी होण्यासाठी जे औषध डॉक्टर देत होते ते औषधच या सगळ्यासाठी जबाबदार आहे. हे नक्की कसं आणि काय घडलं हेच आपण आज जाणून घेऊ या आजच्या बोभाटाच्या लेखातून !!




