'द डायरी ऑफ ए यंग गर्ल' या पुस्तकाची लेखिका ॲनी फ्रॅंक आठवतेय ? तिने तिच्या पुस्तकात बऱ्याचवेळी होणाऱ्या त्रासदायक डोकेदुखी विषयी लिहिलं आहे,ज्यामुळे ती फार अस्वस्थ व्हायची. आता डोकेदुखी तज्ञांच मत आहे ती डोकेदुखीची लक्षण अर्धशिशिशी संबंधित आहेत. सांगायची गोष्ट अशी की असे अप्रत्यक्ष संदर्भ अर्धशिशि विषयी बरेच काही सांगून जातात.अर्धशिशि हा बऱ्याच जणांमध्ये आढळणारा सामान्य आजार असला तरी तो काम करण्यासाठी दुबळा किंवा हतबल करणारा आहे.आपल्यापैकीच बरेच जण या आजाराशी सामना करत असतात. साध्या डोकेदुखी पेक्षा अर्धशिशि जास्त गंभीर असा आजार आहे..
अर्धशिशि यालाच मायग्रेन( Migraine)असेही म्हणतात.
हा एक न्यूरोबायोलॉजिकल (Neurobiological) आजार आहे.ज्यामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना जाणवते.म्हणजेच रुग्णाला डोक्यामध्ये घणाघाती घाव घातल्याप्रमाणे डोके दुखते. यामध्ये आणखीन काही लक्षणे आढळून येतात जसे की,सततची डोकेदुखी होणे, मळमळ होणे, उलटी होणे तीव्र आवाज सहन न होणे आणि लख्ख प्रकाश इत्यादी पण बऱ्याच वेळा अर्धशिशि रुग्णांचे निदानच होत नाही.. जर तज्ञांची मदत घेतली तर वेळेवर निदान होईल व यशस्वीपणे त्यावर उपचार ही करता येतील.



