डॉलरचा भाव अमुक वाढला, रुपया तमुक भावाने पडला अशा गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मग वाटतं, फॉरेनला जाण्याचं आपलं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. जसा रुपयापेक्षा डॉलर वरचढ आहे, तसाच जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथे आपल्या रुपयाची किंमत कित्येक पटीने जास्त आहे. आणि सुखद बातमी म्हणजे हे देश पर्यटनासाठी अगदी बेस्ट चॉईस आहेत राव.
आपण आज बघणार आहोत असे १० देश जिथे जाऊन तुम्हालाही श्रीमंत झाल्यासारखं वाटेल!!









