मिठाचे हे १० उपयोग कदाचित तुम्हालाही माहित नसतील... जरूर वाचा

लिस्टिकल
मिठाचे हे १० उपयोग कदाचित तुम्हालाही माहित नसतील... जरूर वाचा

मंडळी, आपल्या आयुष्यात मीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोबत मानवी शरिराला ते आवश्यकही आहे. पण याव्यतिरिक्तही मीठाचे आणखीन काही महत्वपूर्ण उपयोग आहेत, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील. या पाहूया काय उपयोग आहेत ते...

मीठाचा वापर आपण त्वचेसाठी स्क्रब म्हणून करू शकतो. मीठ हे त्वचेवरील मृतपेशी दूर करून त्वचेची बंद छिद्रे उघडी करतं. त्यामुळे त्वचेला चमक येऊन कोरडी त्वचाही दूर होते. रोजच्या अंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ वापरल्यास तेही त्वचेसाठी उत्तम आहे.

जर तुमच्या शरिरावर मधमाशीने डंख केला असेल तर वेदना होणार्‍या जागेवर मीठ लावा. वेदना आणि सूज.. दोन्हीही गुल होतील.

कधी कधी दिवसभरातील कामाच्या अतिरेकात डोळ्यांना ताण आणि थकवा जाणवतो. अशावेळी कोमट मीठाच्या पाण्यात एखादं स्वच्छ कापड भिजवा, आणि ते डोळ्यांवर ठेवून काहीवेळासाठी आराम करा. डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी हे तुम्ही दररोज केलं तर चांगलंच आहे.

खराब अंडी ओळखण्यासाठी ग्लासभर पाण्यात २ चमचे मीठ घाला. आता या पाण्यात अंडं बुडाल्यास ते ठीक आहे असं समजा, आणि जे तरंगेल ते खराब! सोपंय ना?

चांदीचे दागिने वापरता ना? हे दागिने काही काळानंतर जुने आणि काळसर दिसायला लागतात. त्यावेळी कापडाचा तुकडा घेऊन या दागिन्यांना मीठ लावून घासा. दागिन्यांचा रंग पूर्वीसारखाच चमकदार होईल.

मीठाचा वापर दातांच्या स्वच्छतेसाठी होतो हे तर आपल्याला माहितीच आहे. एक भाग मीठ आणि दोन भाग बेकींग सोडा वापरून तयार केलेली पेस्ट तुमच्या दातांना शुभ्र आणि चमकदार बनवेल. मीठामुळं आपल्या हिरड्याही मजबूत होतात. तेंव्हा दातांसाठी रोज मीठ जरूर वापरा.

बर्‍याचदा सफरचंद, बटाट्यासारख्या फळांचे काप उघड्यावर ठेवल्यास थोड्याच वेळात त्याच्यावर लालसर डाग दिसू लागतात. हे डाग न येण्यासाठी या फोडी मीठाच्या पाण्यात ठेवा.

फ्रिज साफ करतानाही बेकींग सोडा आणि मीठाच्या पाण्याचं मिश्रण जरूर वापरा. यामुळे फ्रीजमधले सगळे डाग सहज दूर होतील. सोबत फ्रीजचं अंतरंग गंधमुक्त आणि चमकदारही होईल.

फ्लॉवरपॉटमधल्या नकली फुलांना टवटवीत बनवण्यासाठीही मीठ कामी येतं. एखादी प्लास्टिकची पिशवी घ्या. तीच्यात मीठ टाकून त्यात ही फुलं घाला आणि पिशवी काही वेळ चांगल्या पध्दतीने हलवा. मग फुलं कशी एकदम फ्रेश!!

घरामध्ये तांब्यापासून बनलेला वस्तू किंवा भांडी असतील तर त्यांना चमक आणण्यासाठी व्हिनेगर आणि मीठ एकत्र करून पॉलीश करा.

पाहिलंत ना मीठाचे किती फायदे आहेत ते? जर तुम्हाला मीठाचे आणखी उपयोग माहिती असतील तर ते तुम्ही खाली कमेन्ट करून नक्की सांगा...

आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका!