बापा घरी आले. गौराई सुद्धा आल्या. दहा दिवस नुसती मज्जा आणि मोदकावर ताव. काय राव बरोबर ना ? मंडळी गणपती बाप्पासाठी आपल्या मनात वेगळाच आदरभाव आहे. महाराष्ट्रात अष्टविनायक तर प्रसिद्ध आहेच, पण या दहा दिवसात गजबजलेला लालबाग आणि चिंतामणी हे सुद्धा पाहण्यासारखे असतात.
पण मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपला बाप्पा हा फक्त भारतापुरताच मर्यादित नसून अख्ख्या जगभरात पसरलेला आहे हे. जगभरात त्याची पूजा केली जाते.
तर मंडळी आज आपण बघणार आहोत जगभरात कुठे कुठे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाची मंदिरं!!









