नुकत्याच आलेल्या “न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालानुसार भारताकडे एकूण ८२३० बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. मागच्या आकड्यांपेक्षा यावर्षीचे आकडे वधारलेले दिसत आहे. या अहवालातून एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे २०१७ मध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवलेली आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारत हा जगातील श्रीमंत देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या अहवालाच्या बाबतीत एक लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक देशातील सर्व व्यक्तींच्या खाजगी संपत्तीचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात कोणत्याही सरकारी मालमत्तेचा विचार केला गेलेला नाही. या रिपोर्ट मध्ये असं नमूद केलं आहे की ज्यांची संपत्ती १० लाखांपेक्षा जास्त आहे अश्या लोकांची संख्या भारतात ३,३०,४०० इतकी आहे.
२००७ ते २०१७ या १० वर्षांच्या काळात भारत संपत्तीच्या बाबतीत ३१६५ बिलियन डॉलर्सवरून ८२३० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे. हे आकडे समाधानकारक असल्याने यातून आर्थिक दृष्ट्या आपली कामगिरी उत्तम असल्याचंच आपण पाहू शकतो.
चला तर पाहूयात भारताबरोबरच कोणते देश या टॉप १० मध्ये आहेत आणि हो...तो कोणता देश आहे जो पहिल्या क्रमांक पटकावलाय ?










