या जिवंत पुतळ्याला हलवून दाखवा आणि १०,०००रूपये मिळवा!!

या जिवंत पुतळ्याला हलवून दाखवा आणि १०,०००रूपये मिळवा!!

हे आहेत अब्दुल अझिझ. ते चेन्नईतल्या व्हीजीपी गोल्डन बीच रिसॉर्टमध्ये जिवंत पुतळ्याचं काम करतात. चेन्नईत अशा जिवंत पुतळ्यांची बहुतेक फॅशनच आहे. तिथं ’पोथी’ नावाचं एक साड्या आणि कपड्यांचं तीन मजली दुकान आहे. त्याच्या प्रवेशद्वारावरही सिनेमात क्लासिकल डान्सर्स घालतात तशा आम्रपाली ड्रेसमध्ये २-३ बायका उभ्या असतात.

तर अब्दुल अझिझ हे काम गेली ३१वर्षं करत आहेत आणि त्यांच्या नोकरीतल्या या सहा तासांत ते हसत नाहीत, आपल्या नेमलेल्या जागेवरून इंचभरही  हलत नाहीत आणि म्हणे त्यांच्या डोळ्याची पापणीही लवत नाही. हे सगळं करू शकण्याचं श्रेय ते पॉवर योगाला देतात. भल्या पहाटे लवकर उठून ते योगा आणि इतर व्यायाम करतात. या जिवंत पुतळ्यामागची प्रेरण आहेत इंग्लंडमधले राणीच्या राजवाड्याबाहेर जिवंत पुतळ्यासारखे उभे असणारे गार्ड्स. इथं या भारतीय पुतळ्याला ’चोल ’ राजाच्या काळातल्या रक्षकासारखा वेष दिलाय.

व्हीजीपी गोल्डन बीच रिसॉर्टच्या मॅनेजमेंटने लोकांना अब्दुल अझिझना हलवून दाखवण्याचं आव्हान दिलंय. जर त्यांना कुणी हलवू शकलं तर त्याचं ते १०,०००रूपये बक्षीस देणार आहेत म्हणे. पण आजवर कुणालाच यात यश आलं नाहीय.

आता जर चेन्नईला या रिसॉर्टमध्ये गेलात तर तुम्हीपण अब्दुल अझिझ यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न नक्की करून पाहा.