भाग १: डोळ्यांना चकवा देणारे १५ भन्नाट फोटो....यातला कोणता फोटो हटके वाटतो?
इंटरनेट तंत्रज्ञानाने दृष्टीभ्रम निर्माण करणारे फोटो तयार केले जाऊ शकतात. फोटोच काय, पण व्हिडीओही तयार केला जाऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी पौर्णिमेच्या चंद्राचा ३० सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रचंड मोठा चंद्र केवळ ३० सेकंदात उगवताना आणि मावळताना दिसत होता. हा व्हिडीओ अर्थातच फेक होता. पण तो असा काही तयार करण्यात आला की लोकांचा त्याच्या खरेपणावर विश्वास बसला.
पूर्ण बातमी वाचण्यासाठी हा लेख जरूर वाचा: सूर्यग्रहणाचा फेक व्हिडीओ पाहिला? मग ग्रहणामुळे इतिहास कसा समजून घेतात ते जाणून घ्या !!
हे झालं फेक गोष्टींचं!! पण काही वेळा आपला कॅमेराच आपल्या डोळ्यांना चकवा देणारे क्षण कैद करतो. अशा काही मोजक्या क्षणांना आज आम्ही बोभाटाच्या वाचकांच्या पुढे ठेवणार होतो. चला तर पाहूया.











