भाऊबीज जवळ आली आहे.आपल्या बहीणीसाठी काहीतरी खास भेटवस्तू घेण्यासाठी बाजारात 'भाऊगर्दी' झाली आहे पण नवी मुंबई परिसरात गेली अनेक वर्षं एक विचित्र परिस्थिती नजरेस येते आहे.एकेकाळी नव्या मुंबईत राखी आणि भाऊबीज या सणांची शान काही औरच होती.पण गेल्या काही वर्षांमध्ये या भागात बहीण भावांची कायमची ताटातुट झाली आहे. भाऊ बहीणीला भेटत नाहीत आणि बहीणही भावाला भेटू इच्छित नाही ! हे असं विपरीत घडण्यामागे १२.५% हा आकडा कारणीभूत आहे. हे कारण वाचून तुम्ही आम्हाला वेड्यात काढाल हे नक्कीच पण भाऊ बहिणीत दुरावा निर्माण करणारे हे १२.५% चे काय प्रकरण आहे ? हे समजण्यासाठी नव्या मुंबईचा इतिहास आणि एका द्रष्ट्या नेत्याचे स्मरण करणे आवश्यक आहे.





