आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात ज्यांना त्यांची नोकरी आवडत नाही. नोकरीबद्दल त्यांच्या अनेक कटकटी असतात. कधी पगार, कधी कामाचे ठिकाण तर कधी बॉसचा त्रास अशा गोष्टींसाठी नेहमी तक्रार सुरू असते. अशावेळी काही लोकांना आपल्या आवडीची नोकरी असती तर किती बरे असते असे वाटते. पण या जगात काही नोकऱ्या अशाही आहेत ज्या लोकांना गंमतशीर तर वाटतीलच, आणि करायलाही आवडतील.
करायला हमखास आवडतील अशा १५ विचित्र आणि तितक्यात मजेदार नोकऱ्या!


१) भाड्याचा बॉयफ्रेंड
जपानमध्ये श्रीमंत मुलींकडे बॉयफ्रेंड नसला तर आपण जशी भाड्याने एखादी वस्तू घेतो तसे तिथे भाड्याने बॉयफ्रेंड मिळतात. त्यांना फक्त त्या मुलींसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असतात. अशा कामाचे पैसे मिळतील तर कोण नाही जाणार?
तसा एका गुरगांवच्या मुलानेही स्वत:ला भाडोत्री बॉयफ्रेंड म्हणून सर्व्हिसेस देऊ केल्या होत्या.
या मुलानं काढली आहे भाडोत्री बॉयफ्रेंड योजना...पोरींनो, सिंगल राहण्याचे दिवस गेले !!
. पण त्याचं पुढे काय झालं ठाऊक नाही. मुंबई-पुण्यातही बॉयफ्रेंड भाड्याने मिळण्याचे ॲप निघाले होते.
आता मुंबई आणि पुण्यात बॉयफ्रेंड सुद्धा उधारीवर मिळेल....जाणून घ्या या नवीन अॅप बद्दल !!
त्याबद्दल सध्या काही वाचायला मिळत नाही म्हणजेच त्यांनीही कदाचित गाशा गुंडाळला असावा.

२) लोकांना रेल्वेत ढकलणारा
जपानमध्ये अनेक रेल्वे प्लेटफॉर्म्सवर खूप गर्दी असते. लोक दरवाज्यांना लटकलेले असतात. अशा लोकांना रेल्वेत ढकलण्यासाठी युनिफॉर्मधारी लिम नेमलेले असतात. लोकांना रेल्वेत ढकलण्याची अगर त्यांना मिळते.

३) झोपण्याची नोकरी
झोपण्यासाठी कुणी पैसे देते का? तर हो!! चक्क झोपून राहण्यासाठी पण पैसे मिळतात. मानवी मेंदूचा अभ्यास करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक लोकांना झोपून राहण्यासाठी पैसे देतात. जेणेकरून त्यांच्या मेंदूचा अभ्यास करता येईल.

४) रांगेत उभे राहणारे
आपल्याला अनेक ठिकाणी नंबर लावून लायनीत उभे राहावे लागते. या गोष्टीचा कंटाळा येत असला तरी या कामाचे पैसे मिळाले तर कोणीही करेल. अनेकांना आपला बहुमूल्य वेळ लायनीत उभे राहून वाया घालवायचा नसतो. अशावेळी ते लोकांना लायनीत उभे राहण्यासाठी पैसे देतात.

५) लग्नात पाहुणे
काही लग्नांमधील जेवण बघून असे वाटू शकते की इथे जायला हवे, पण आमंत्रण नसल्याने जाता येत नाही. पण लग्नात पाहुणे म्हणून येण्याचेही लोकांना पैसे दिले जातात. सुशांत सिंग राजपूत आणि परिणिती चोप्राच्या 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये हे तुम्ही पाह्यले असेलच.

६) पाण्याची घसरगुंडीची चाचणी करणे.
घसरगुंडीतुन घसरत येऊन पाण्यात जाणारे लोक तुम्ही बघितले असतील किंवा अशी घसरगुंडी तुम्ही खेळली असेल. यात किती मजा असते. पण ही घसरगुंडीची चाचणी करण्याचेही लोकांना पैसे मिळतात.

७) परफ्युम टेस्टर
काही लोकांचं नाक भारी तीक्ष्ण असतं. त्यांना त्यामुळे चांगले परफ्युम कोणते याची चांगली जाण असते. अशा लोकांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. परफ्युम टेस्ट करण्याचाही पगार मिळतो.

८) विजेचा झटका देणे
मेक्सिको या देशात चौकांमध्ये विजेचा झटका देणारे पगारी लोक उभे असतात. जास्त दारू पिलेल्या लोकांना विजेचा नॉर्मल झटका देऊन ठिकाणावर तेथे आणले जाते.

९) आलिंगन देण्याची नोकरी
जगात काही लोक इतके एकटे असतात की ते लोकांना आलिंगन देण्याचे पण पैसे देतात. परदेशात असे अनेक प्रोफेशनल आलिंगन देणारे लोक सापडतात. http://snugglebuddies.com/ इथे त्याची अधिक माहिती मिळेल.

१०) कार नंबर झाकणारा
तेहराणमध्ये नियमांनुसार काही विशिष्ट नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या सम तारखेला, तर दुसऱ्या विशिष्ट नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या विषम तारखेला रस्त्यावर धावतात. अशावेळी आपला नंबर पोलिसांना दिसू नये म्हणून पोलीस असतील तिथे नंबर झाकला जाईल असा गाडीच्या मागे चालणाऱ्या माणसास पैसे दिले जातात.

११) शोक व्यक्त करणारे
चीनमध्ये अनेक ठिकाणी एखाद्याचा मृत्यू झाला किंवा इतर संकट असले तर तिथे जाऊन शोक व्यक्त करणे, धीर देणे अशा कामांसाठी पैसे दिले जातात. अशी प्रथा राजस्थानातही आहे. अशा रडणाऱ्या रुदाली पैसे घेऊन शोक करतात.

१२) फर्निचर टेस्टर
हा पण असाच एक जॉब आहे जो अनेकांना आवडू शकतो. तुम्हाला फक्त सोफा, टेबल अशा गोष्टींना टेस्ट करून त्यांच्याबद्दल सांगणे एवढेच काम करण्याची पगार मिळते.

१३) सायकल पाण्यातून काढणे
मस्टरडॅम येथे एम्सटल नदीतून दरवर्षी जवळपास १५ हजार सायकली काढल्या जातात. या सायकली काढण्यासाठी लोकांना पगार दिला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सायकली काढण्यासाठी तितके लोकही लागतात.

१४) सिरीज पाहण्याचे काम
जगात आज लाखो लोक पैसे मोजून नेटफ्लिक्स सिरीज आणि सिनेमे पाहतात. पण नेटफ्लिक्स अनेक लोकांना आपले कंटेंट बघून त्याचा गोशवारा लिहिण्यासाठी पैसे देते.

१५) बिअर-वाईन टेस्टर
बिअर आणि वाईनचे चाहते काय कमी नाहीत. ही पेये पिण्याचे पैसे मिळतात हे माहीत झाल्यावर या जॉबवर लोकांची झुंबड उडेल हे नक्की. बियर-वाईन पिऊन त्याच्या रेसीपीबद्दल मत व्यक्त करण्यासाठी वार्षिक पॅकेज दिले जाते.
मग, कशा वाटल्या या विचित्र पण तितक्याच इंटरेस्टिंग नोकऱ्या? आता या विचित्र नोकऱ्यांबद्दलही वाचा
इतिहासातील १० विचित्र नोकऱ्या !!
आणि त्या आता अस्तित्वात नाहीत याबद्दल आनंद व्यक्त करा..