खांद्यावर सामानाने खचाखच भरलेली एक जड बॅग घेतलेल्या खूपशा बायका आपल्या आजूबाजू सर्रास दिसतात. म्हणजे वन साईड हॅण्डबॅगची फॅशनच आहे, असं म्हणा की! रस्ते , ट्रेन, मॅाल , कॅालेज अगदी सगळीकडेच या हॅण्डबॅगस् प्रत्येकीच्या हॅण्डमध्ये दिसतात . पण ही हॅण्डबॅगची फॅशन महिलांना महागात पडत असेल तर?
फॅशन किंवा ट्रेंडिंग आणि आरोग्य यांपैकी कोणत्या गोष्टीला तुम्ही जास्त महत्व द्याल? अहो, चांगलं आरोग्य कोणाला नको असतं बरं? पण या हॅण्डबॅगच्या वापरामुळे महिलांना काही तोटेही होतच असतात. जड हॅण्डबॅगच्या वापरामुळे मान आणि पाठीचा कणा यांना त्रास होतो, एवढंच नाही तर तुमच्या चालण्याच्या नॅचरल पद्धतीवरही वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही चालत असता, तेव्हा तुमचे खांदे आणि पाय हे एका लयीत हालचाल करत असतात. पण जेव्हा तुम्ही एका खांद्यावर जड बॅग घेऊन चालता, तेव्हा त्या एका खांद्याच्या हालचालीची गती कमी होते. मग होतं असं की, दुसरा खांदा जास्त वेगाने हालचाल करतो. त्यामुळं दोन्ही खांद्यांना त्रास होतो आणि तुमची चालण्याची पद्धत चुकते. हॅण्डबॅगच्या वजनामुळे स्नायूंवर दबाव येतो आणि त्यामुळे ते स्नायू दुखतात. खांद्यावर घेतलेल्या वजनदार बॅगेमुळं पाठीचा कणा आणि मान यांच्या स्नायूंवर दबाव येतो आणि होतात मग सुरू मानदुखी , पाठदुखी....
पण तुम्ही मात्र घाबरुन जाऊ नका. हॅण्डबॅगस् वापरायच्याच नाहीत, असंही काही नाही. फक्त हॅण्डबॅगस् वापरत असताना पुढील काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात...





