जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत अगदी पहिल्या चार पाच वस्तूंमध्ये आधार कार्डचा नंबर लागतोय अशी परिस्थिती सरकारने निर्माण केलीय. आज त्याहून जबर बातमी कळालीय, सरकारनं म्हणे कोणत्या तरी कलमाच्या आधारे ८१ लाख आधार कार्ड ब्लॉक केलीयेत. ही माहिती सरकारनेच राज्यसभेत दिली आहे.
आधार कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला दोन आधारकार्ड देण्यात आले असतील, बायोमेट्रिक डेटामध्ये बदल, कागदपत्रे व्यवस्थित नसल्यास आधार ब्लॉक केलं जाऊ शकतं. ५ वर्ष वयाच्या खालील मुलांना पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा व १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकदा आधारचं रिव्हेरिफिकेशन करावं लागतं.
आता बघूयात कसं तपासायचे आधारचं स्टेटस :
1. UIDAI च्या वेबसाईटच्या https://uidai.gov.in होम पेजवर तुम्हाला आधार सर्व्हिसेस नावाचा टॅब दिसेल. त्या खाली तुम्हाला Verify Aadhar Number ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
2. हे तुम्हाला एका नव्या पानावर घेऊन जाईल. तिथे तुमचा आधार नंबर आणि व्हेरिफिकेशन टेक्स्ट भरून हिरव्या रंगाच्या Verify बटणावर क्लिक करा.

3. खालच्या चित्राप्रमाणे तुमच्या नावासमोर ग्रीन टिकमार्क आला, तर तुमचं आधार चालू आहे.

जर तुमचं आधार कार्ड ब्लॉक झालं असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली कागदपत्रे दाखवून आधार चालू करून घ्यावे लागेल.

