आता आणखी काही सांगण्यापूर्वी एक महत्वाची सूचना ! इथे बाजार हा शब्द शेअरबाजार या अर्थाने वापरला आहे.थोरले बाजीराव हा शब्दप्रयोग शेअरबाजारातील मोठे गुंतवणूकदार या अर्थाने वाचावा.थोरले बाजीरावचे सोप्पे रोजच्या बातम्यांमध्ये झळकणारे उदाहरण म्हणजे राकेश झुनझुनवाला ! पण मंडळी हा शेअरबाजार आहे , या बाजारात राकेश झुनझुनवाला हे एकटेच बाजीराव नाहीत. त्यांच्यापेक्षाही मोठे खिलाडी या बाजारात आहेत पण तुम्हाआम्हाला त्यांची ओळख नाही. म्हणून या लेखमालिकेत शक्यतो प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या थोरल्या बाजीरावांची ओळख आम्ही करून देणार आहोत.

