बिल गेट्स हे नाव तुम्हाला फक्त कंप्युटर आणि आयटीशी (आणि सध्या त्याच्या गाजणार्या घटस्फोटाशी) संबंधित वाटत असेल आणि वॉरन बफे हे नाव फक्त गुंतवणूकीशी संबंधित वाटत असेल. आपापल्या क्षेत्रातल्या दोन दिग्गजांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे यांच्याकडे असणारा प्रचंड पैसा !
हे दोन्ही मित्र देखील आहेत हे दोन्ही मित्र आता एकत्र येऊन एका वेगळ्याच क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. आता कोणीही हा विचार करेल की ह्यांचं काय बॉ, आहेत पैसे बक्कळ तर गुंतवतील अणुउर्जेत आणि करतील दोनाचे चार! आज इथे प्लँट टाकतील तर उद्या मंगळावर टाकतील! सगळा पैशाचा खेळ आहे ! तर मग ही बातमी वाचण्यात काय मतलब आहे ? पण तुम्हाला कल्पना आहेच की बातमीत 'दम' असल्याशिवाय बोभाटा होत नाही. पण आधी हा काय प्रकल्प आहे ते जाणून घेऊ या !






