या बर्थडे स्प्रेमुळे असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता !!

या बर्थडे स्प्रेमुळे असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता !!

बर्थडे पार्टी मध्ये, लग्नात एक पांढरा फेस असलेला स्प्रे मारून जल्लोष करण्याची पद्धत आहे. हाच स्प्रे एका मुलाच्या जीवावर बेतला आहे.

झालं असं की, एका लहान मुलाची बर्थडे पार्टी होती, सगळे ‘हॅप्पी बर्थडे’ ओरडत होते, केक कापला गेला, सगळे मोठ्याने ओरडतात, मुलाचे बाबा आनंदाने मुलाचं डोकं स्प्रेने भरून टाकतात, मुलगा स्प्रे पासून वाचण्यासाठी खाली मान घालतो आणि तेवढ्यात त्याचा संपर्क केक वर लावलेल्या मेणबत्त्यांशी आल्याने मुलाच्या डोक्यावर भडका उडतो. हा प्रकार घडलाय साधारण बर्थडे पार्टीत वापरलेल्या ‘स्प्रे’ मुळे. मंडळी हा साधारण स्प्रे एवढा जीवघेणा ठरेल हे कोणालाच वाटलं नव्हतं.

मंडळी या व्हिडीओचा कुठचा आहे आणि कधी काढला गेलाय हे अद्याप समजलेली नाही. पण हे का घडलं असा एक प्रश्न पडतोच. याचं उत्तर म्हणजे स्प्रे मध्ये असलेल्या ज्वलनशील वायु. हा वायू आगीच्या संपर्कात आल्याने त्याने लगेच पेट घेतली !! अशीच एक घटना अर्जेन्टिना मध्ये घडली होती. या घटनेत एका लहान मुलीसोबत हा प्रकार घडला. चारही बाजूंनी स्प्रे उडाल्या नंतर तिच्या चेहऱ्याजवळ भडका उडाला आणि एकच धावपळ सुरु झाली.

मंडळी तुम्ही सुद्धा हा स्प्रे अनेकदा वापरला असणार पण या पुढे थोडं जपून राहा.