बहिण-भावाच्या नात्यांचं सुंदर दर्शन घडवणारे ६ सुंदर चित्रपट.. तिसरा सिनेमा तर तुम्ही नक्की पाहिलाच असणार

लिस्टिकल
बहिण-भावाच्या नात्यांचं सुंदर दर्शन घडवणारे ६ सुंदर चित्रपट.. तिसरा सिनेमा तर तुम्ही नक्की पाहिलाच असणार

’तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं ज्या नात्याचं वर्णन करता येईल ते एकच नातं आहे, भावा-बहिणीचं. भाऊ-बहिण ज्यावरून भांडू शकत नाहीत असा एकही विषय या जगात नसेल पण एकमेकांसाठी जीव टाकणारीही तीच भांडखोर भावंडं असतात.  भाऊ-बहिणीच्या नात्यांवर मराठी-हिंदी आणि इतर भाषांतही तितकेच आहेत.

आज रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पाहूयात भाऊ-बहिणींवर चित्रित  काही सर्वोत्तम सिनेमे. आम्हांला सांगा यांतले किती सिनेमे तुम्ही पाहिले आहेत ते!!

हॅपी जर्नी

हॅपी जर्नी

गेल्या वर्षी आलेला हा एकदम फ्रेश सिनेमा होता. मृत्यूनंतरही भावाला सोबत करणारी खेळकर आणि अल्लड बहिण प्रिया बापटने मस्त रंगवली होती.

एलिझाबेथ एकादशी

एलिझाबेथ एकादशी

झेंडू आणि तिच्या भावाची एलिझाबेथला वाचवायची धडपड, एकमेकांसाठी खोटं बोलणं, सावरणं या सगळ्यांची गोष्ट म्हणजे इलिझाबेथ एकादशी. विज्ञानाची कास धरायला सांगणारा हा पंढरपुरात घडणारा सिनेमा कितीही वेळाअ पाहिला तरी कंटाळा येत नाही.

इकबाल

इकबाल

क्रिकेटचं वेड असलेली आई आणि तिच्याइतकंच वेड असलेला मूक-बधीर क्रिकेटरची ही गोष्ट. त्याच्या भारतीच्या क्रिकेट टीममध्ये सामील होण्याच्या प्रयत्नांत त्याला साथ असते त्याच्या बहिणीची. ती त्याला शेतातल्या गाई-म्हशींसोबत सराव करायला मदत करते, त्याला क्रिकेटर्सच्या कँपमध्ये घेऊन जाते आणि भावासाठी शक्य असेल ते सगळं काही करते. बोभाटाच्या वाचकांपैकी कुणी हा सिनेमा पाहिला नसेल असं वाटत नाही.

भाग मिल्खा भाग

भाग मिल्खा भाग

मिल्खा सिंगाच्या या सिनेमात त्यांच्या आयुष्यात त्यांच्या बहिणीने दिलेलं योगदान स्पष्ट दिसतं. निर्वासितांच्या छावण्यांत हरवलेला भाऊ, नंतर निर्दयी पतीच्या हातून मार खाणारा भाऊ या सर्व हालपेष्टांमधून मिल्खाला कुणी साथ देत असेल तर ती त्यांची बहिण असते. 

माय ब्रदर निखिल

माय ब्रदर निखिल

’एड्स’ हा शब्दही उच्चारणं ज्या काळात एक मोठा टॅबू होता, त्या काळात आलेला हा सिनेमा. एड्स झालेल्या भावाला सरकारी नियमांमुळे होणार्‍या  त्रासामुळे त्याच्याबाजूने सरकारविरूद्ध लढणार्‍या बहिणीची भूमिका जुही चावलाने केली होती. 

चिल्ड्रेन ऑफ हेवन

चिल्ड्रेन ऑफ हेवन

इराणमध्ये सिनेमांवर इतकी बंधनं आहेत की लहान मुलांवर सिनेमा काढणं हा सगळ्यात तिथला सोपा पर्याय आहे.  चिल्ड्रेन ऑफ हेवन हा त्यातल्या सगळ्या सिनेमांतला बेस्ट चित्रपट ठरावा.  गरीब घरांतली, आपल्या नेहमीच्या सौंदर्य-गोंडस-गुटगुटीतपणाच्या व्याख्येत न बसणारी ही बहिण-भावाची जोडी खूप लळा लावते. भाषेची मर्यादा न जाणवू देणारा हा सिनेमा आजवर पाहिला नसेल तर नक्की बघा. पण हो,  या सिनेमाची भ्रष्ट कॉपी म्हणून आपल्याकडे आलेला ’बम बम भोले’बिल्कुल पाहू नका.